हे श्रमदान नसून श्रम-उत्सव : किरण राव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |




नाशिक :  महाराष्ट्र दिनी राज्यात ठिकठिकाणी सुरू झालेले पाणी फाऊंडेशनचे महाश्रमदान हा एक श्रम उत्सव असल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेते आमीर खान यांच्या पत्नी किरण राव यांनी सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी अडीच हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी श्रमदान केल्याची माहिती फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी दिली. यात ’माझ्या नवर्‍याची बायको’ फेम अनिता दाते, पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजीत भटकळ, कोरिओग्राफर सोनिया परचुरे यांच्यासह सरपंच संजय डावरे, जैन सामाजिक संघटनेचे साखला, हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते. पहाटे ६ वाजता या अभियानाला प्रारंभ झाला. महाश्रमदान अभियानात राज्यभरातील जलदूत टिकाव, फावडे, घमेले घेऊन सहभागी झाले होते. हजारो हातांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.

नव वधुवरांनी देखील घेतला सहभाग 

दि. २ मे पासून वैवाहिक जीवनाला प्रारंभ करणार्‍या नितीन जाधव व जयश्री वामने या नववधु-वरांनी काल कोनांबेत श्रमदान केले. यावेळी प्रहारच्या औद्योगिक कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली, राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष राजाराम मुरकुटे, अशोक जाधव, भावेश जाधव यांनीही अभियानात सहभागी होत श्रमदान केले. नवरदेवाचे काका अशोक जाधव यांनी नवरदेवाच्या मिरवणुकीत होणार्‍या अनाठायी खर्चाला फाटा देत पाणी फाऊंडेशनकडून करण्यात येणार्‍या कामाच्या डिझेलसाठी २ हजार रुपयांची मदत करून आदर्श निर्माण केला आहे. अभिनेते आमीर खान यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेली ही चळवळ काळाची गरज बनली आहे. त्यांच्या हाकेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आपण नवीन आयुष्याला सुरुवात श्रमदान करून करावी, असा विचार मनात आला. म्हणून या महाश्रमदान अभियानात सहभागी झालो असल्याचे नितीन म्हणाला. .

@@AUTHORINFO_V1@@