हातनूर धरणातील पाणी तापीत सोडण्याची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |

 
हातनूर धरणातील पाणी तापीत सोडण्याची मागणी
 
 
जळगाव तालुक्यातील २५ गावांच्या पाणीप्रश्नी ना. गुलाबराव पाटील यांची जिल्हाधिकार्‍याशी चर्चा
 
जळगाव, ३ मे
जळगाव तालुक्यातील २५ गावांच्या पाणी टंचाई निवारणासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील सरपंच व शेतकरी यांच्या समवेत जळगाव ३ रोजी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
जळगाव तालुक्यातील विदगाव आवार तुरखेड़ा धामणगाव, खापरखेडा, नांद्रा, सुसदे, बिलवाड़े, भोलाने, डिकसाई, रीधुर, आमोदा, घारडी, धानोरा, करंज, सावखेडा, किनोद, भादली, भोकर आदी गावे आज रोजी पाणी टंचाईचा सामना करत आहेत. यातील काही गावांच्या सरपंच व शेतकर्‍यांनी ना. पाटील यांच्याकडे कैफियत मांडून हतनूर धरणाचा पाणीसाठा तापी नदीत सोडन्याची मागणी केली. त्याची दखल घेत ना. पाटील यांनी गावकर्‍यांसमवेत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
तापी नदीतले पाणी आटल्यामुळे ही टंचाई निर्माण झाली असून जर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्यास २५ गावांचा पाणी प्रश्न उन्हाळ्यात मार्गी लागू शकतो व गावकर्‍यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी पं.स. सदस्य जनार्धन पाटील, दिलीप जगताप माजी सरपंच रीधुर, लीलाधर कोळी सरपंच घारडी, सुधीर पाटील सरपंच रीधुर, प्रल्हाद पाटील माजी सरपंच, पुंडलिक पाटील सरपंच नांद्रा, बालकृष्ण कोळी नांद्रा, अनिल मंडोरे सरपंच धामणगाव, बाळू चौधरी सरपंच आवार, आन्ना बागुल, भगवान कुंभार, साहेबराव कोळी, पन्नालाल पाटील, संजय कोळी, सुनील कोळी आदी गावकरी व शेतकरी उपस्थित होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@