पोटभाडेकरूंचे गाळे सील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |
 
 पोटभाडेकरूंचे गाळे सील
जळगाव, ३ मे
फुले व्यापारी संकुलातील पोटभाडेकरुंच्या गाळ्यांना गुरुवारी सील लावण्यात आल्याने अन्य गाळेधारकांचे धाबे दणाणले आहे.
मनपाने मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना ८१ ब प्रमाणे नोटीस बजावल्या होत्या. याबाबत न्यायालयात काही व्यापारी संकुलांची याचिका अद्याप प्रलंबित आहे.
गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे होणारी गाळेधारकांची बैठक रद्द झाल्याचे समजताच मनपा प्रशासनाने पोटभाडेकरू असलेल्या गाळ्यांना सील लावण्याची कारवाई बुधवारी सुरु केली होती.
बुधवारी १५ गाळ्यांना सील लावण्यात आले होते. गुरुवारी दुपारी ४.३० च्या सुमारास मनपाचे पथक पुन्हा सेन्ट्रल फुले मार्केटमध्ये पोहोचले.
फुले व सेंट्ल फुले व्यापारी संकुलातील काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने बुधवारी १५ गाळ्यांना सील लावण्यात आले होते.
गाळेधारकांचे नेते डॉ. शांताराम सोनवणे यांच्या मध्यस्तीने उर्वरीत काम थांबले होते. दरम्यान चंद्रकांत डांगे यांची जळगाव मनपा आयुक्तपदी नेमणूक झाली. त्यामुळे गाळ्यांना सील लावण्याचे काम लांबणीवर पडणार असे वाटत असतांना गुरुवारी हे काम सुरुच राहिले.
गुरुवारी दुसर्‍या माळ्यावर जी विंगमध्ये असलेल्या दि ओरीयन्टल इंश्युरंस कंपनी लिमिटेडचे दोन गाळे सील करण्यात आले.
संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी मनपा कर्मचार्‍यांनी शहर पोलिसात धाव घेतली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@