सरपंचाच्या घरुनदारूचा साठा जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |
 
 
 
सरपंचाच्या घरुन
दारूचा साठा जप्त
 
पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांच्या आदेशानूसार पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, उपनिरीक्षक सिध्दार्थ खरे व डीबीचे राहुल सोनवणे, विजय पाटील, किरण पाटील, अजय मालचे, महिला पोलीस भावसार टीमने भातखंडे गावी सरपंच रेखा गणेश वाघ यांच्या घरी अचानक धाड टाकली असता सुमारे १० हजार रुपये किमतींच्या मद्याच्या ५७ बाटल्याचां अवैधरित्या दारूचा साठा घरात आढळून आला. गणेश वामन वाघ (२९) यास अटक करण्यात आली आहे. सरपंच रेखा गणेश वाघ व गणेश वाघ या दोघविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंचाच्या घरातच अवैधरित्या दारूचा साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@