माहितीच्या अधिकाराचा गैरवापर रोखण्यासाठी अर्जदाराची संकेतस्थळावर माहिती द्यावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |
 
 
 
  
 
 
अलका केरकर यांची मागणी 
 
 
 
मुंबई  : माहितीच्या अधिकाराचा गैरवापर रोखण्यासाठी अर्जदाराची संकेतस्थळावर माहिती द्यावी त्या संकेतस्थळावर अर्जदाराची माहिती देण्यात यावी अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांनी केली आहे. 
 
 
 
अलका केरकर यांनी सांगितले कि ,सार्वजानिक प्राधिकरणाच्या कामात पारदर्शकता यावी,उत्तरदायित्व निर्माण व्हावे ,कारभार भ्रष्टाचार विरहित व्हावा, नागरिकांना कामकाजाची माहिती मिळावी यासाठी देशात माहिती अधिकार कायदा लागू करण्यात आला. परंतु या कायद्याचा बऱ्याच ठिकाणी गैरवापर होत आहे. व्यावसायिक तक्रारदार माहिती अधिकारातून मिळालेली माहिती संकलित करून त्याचा गैरवापर करतात. एखादया कामाबाबत माहिती मिळवून त्याबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल करतात. त्याची दखल घेऊन प्रशासन कामाला लागते. परंतु अचानक तक्रारदार आपली तक्रार मागे घेतो त्यामुळे पालिकेचा वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे पालिकेने एक संकेस्थळ निर्माण करावे त्यावर माहिती अधिकारातून अर्ज करणाऱ्याचे नाव ,मागविलेली माहिती त्याचा तपशील दिल्यास माहिती अधिकाराचा वापर करून मिळविलेल्या माहितीच्या दुरुपयोग करणाऱ्यावर वचक बसेल असे त्यांनी म्हटले आहे.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@