प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथे नवीन लिफ्ट बसविणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |
 
 
 
 
नाट्य रसिकांना दिलासा मिळणार 
 
 
मुंबई  : बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिरमधील लिफ़्ट खुप जुन्या झाल्या असून त्यांचे आयुष्यमान संपुष्टात आले आहे त्यामुळे जुन्या लिफ्ट काढून नवीन तीन लिफ्ट बसविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या नाट्यमंदिरात नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या नाट्य रसिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावात ,एकाच वेळी ८ प्रवासी (५४४ किलो) वाहून नेण्याची क्षमता असलेली लिफ्ट नव्याने बसविण्यासाठी मेसर्स ओमेगा एलिव्हर्स या कंत्राटदाराला कंत्राट देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्याला नवीन लिफ्टसाठी एकूण ६३ लाख ४४ हजार ५६२ रुपये देण्यात येणार आहेत.
 
 
 
कंत्राटदार या नाट्यगृहाच्या जुन्या लिफ्टचे १ लाख ३५ हजार रुपये पालिकेला देणार आहे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिरमध्ये तळमजला अधिक चार मजली इमारतीत नाट्य रसिकांना ये-जा करणे सोयीस्कर व्हावे यासाठी तीन लिफ्टबसविण्यात आल्या होत्या. परंतु त्या तीन लिफ्ट या आता बराच काळ झाल्याने जुन्या झाल्या आहेत.या लिफ्टचे आयुष्यमानही संपुष्टात आले असून तरीही त्याचा वापर केल्यास भविष्यात अपघात घडू शकतो. म्हणून या नाट्यमंदिराच्या प्रशासकीय अधिकारयांनी या तीन लिफ्ट तत्काळ बदलण्याची विनंती पालिका प्रशासनाला केली होती. पालिकेनेही त्याची लगेचच दखल घेऊन या तीन लिफ्ट बदलण्यासाठी तसा प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@