शेतकरी कर्जबाजारी झाला तरी देशाशी द्रोह करीत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांचे सामनेर सभेत प्रतिपादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |
 
शेतकरी कर्जबाजारी झाला तरी देशाशी द्रोह करीत नाही
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांचे सामनेर सभेत प्रतिपादन
 
पाचोरा, ३ मे
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याला सन्मानाचे जीवन मिळालेच पाहिजे, तो कर्जबाजारी झाला तरी देश सोडून जात नाही, असे परखड प्रतिपादन खा.राजू शेट्टी यांनी सामनेर येथे केले.
धर्मा पाटील यांच्या आत्महत्त्येनंतर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत विखरणगावापासून शेतकरी सन्मान अभियानाची सुरुवात होत आहे. कायद्याने शेतमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, स्वामिनाथन आयोग लागू व्हावा, पीकविमा भरपाई मिळावी. आम्हाला आणखी धर्मा पाटील होऊ द्यायचे नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना तुम्ही एकटे नाहीत, याचा विश्‍वास देण्यासाठी १ मेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी सन्मान अभियान राबवण्यात आले आहे. धर्मा पाटील यांच्या विखरण (जि. धुळे) या गावातून त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांच्या सहकार्याने अभियानाची सुरवात केली.
२ मे रोजी सायंकाळी आठ सामनेर ग्रामपंचायत च्या प्रांगणात शेतकर्‍यांच्या सभेला खा.राजू शेट्टी यांनी संबोधित केले.
रसिकाताई ढगे यांनी शेतकर्‍याच्या मुलांनी आपल्या आई वडिलांची सेल्फी घेऊन पहा तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर खरा स्वाभिमान दिसेल, असे सांगितले.
घनश्याम चौधरी यांनी आपल्या भाषणात वीज पुरवठाच्या अडचणीबाबत दाखले देऊन वीजपुरवठा व अतिरिक्त बिल याविषयी मार्गदर्शन केले.
स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकर्‍यांना आवाहन केले की झेंडा कोणताही असू द्या मात्र झेंडाचा दांडा आपला ठेवा , फसवी कर्जमाफी योजनेचा पाढा ही त्यांनी वाचला, शेतकर्‍यासाठी कापसाला उपोषणाला बसणारे मंत्री कुठे गायब झाले दिसतच नाहीत,
डॉ. प्रकाश पोपळे, हंसराज बदगुळे पाटील, अनिल पवार, संदीप जगताप, माणिक कदम, अमोल पारध्ये, सोमनाथ बोराडे, सयाजी मोरे, गजानन भंगाळे, शर्मिलाताई येवले, पुजाताई मोरे, संभाजी सोनवणे, शिवाजी पाटील, संतोष पाटील आर के पाटील , संभाजी सोनवणे, संजय जाधव, सामनेर परिसरातील देविदास पाटील लक्ष्मण साळुंखे, अशोक पाटील लासगावचे डॉ हाजी देशमुख, आसनखेडा जी. बी. पाटील यांच्यासह सामनेर, लासगाव, आसनखेडा, पाथरी, वडली, जवखेडा, कुरंगी वावडदा, डोमगाव बाबरुड राणीचे परिसरातील अनेक गावातून शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय जाधव सूत्रसंचालन अशोराज तायडे यांनी तर आभार लक्ष्मण साळुंखे यांनी मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@