विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |



नाशिक : नाशिकमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि युतीतीलच काही बंडखोरांच्या आव्हानामुळे विधान परिषदेची निवडणूक कशी होणार याबाबत चर्चा असताना हे पक्ष एकत्र आल्याने युती जिंकण्याची शक्यता वाढली आहे. नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यानंतर शिवाजी सहाणे आणि त्यांचा गट नाराज होते. त्यातच ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचेही सेनेपुढे आव्हान होते.

दरम्यान शिवसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघासह राज्यातील इतर सहा जागांसाठी शिवसेना आणि भाजपने युती केली आहे. मात्र पालघर आणि भंडारा-गोंदियाच्या जागेबद्दल घोळ सुरूच आहे. मागील आठवड्यात नाशिकच्या दौर्‍यावर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनीही युतीचे संकेत दिले होते.
@@AUTHORINFO_V1@@