पर्जन्य जलवाहिन्याची सफाई होणार पालिका ९ कोटी खर्च करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : मुंबईत पावसाळापूर्व कामाला पालिकेने जोर दिला आहे. या अंतर्गत पर्जन्य जलवाहिन्या सफाई केली जाणार आहे. मुंबई महापालिका चार नवीन यंत्रणा खरेदी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. यासाठी पालिका ९ कोटी १७ लाख ८ हजार २४० रुपये खर्च करण्यात येणार आहे. 
 
पावसाचे पाणी पर्जन्य वाहिन्यांच्या उताराव्दारे समुद्रात सोडले जाते. त्यामुळे पर्जन्यवाहिन्यामध्ये जास्त प्रमाणात गाळ साचतो. या वाहिन्यांमधून ओला वा सुका गाळ मल कचरा ,निरुपयोगी बांधकाम साहित्य वाहून जाते त्यामुळे वारंवार साफ करणे गरजेचे असते. बंधिस्त पर्जन्य वाहिन्या गाळ विरहित करण्यासाठी आणि साफ करण्यासाठी व्हॅक्यूमव्दारे चालणारे सक्शन यंत्रणा , पाण्याच्या उच्च दाबावर चालणारे जेटिंग यंत्रणा, ह्या दोन्ही व्यवस्था एकत्रितयंत्रणा वापरण्यात येते. 
 
सध्या पर्जन्य वाहिन्याखात्याकडे एकूण १२ वाहनावर बसविलेली सक्शन यंत्रणा, ०३ जेटिंग यंत्रणा व ०८ सक्शन कम जेटिंग यंत्रणा आहे. ही यंत्रणा शहर उपनगरातील सर्व पर्जन्यवाहिन्या साफ करण्यासाठी वापरली जातात. ही यंत्रणा मर्यादित असून त्याचा वापर ६ मीटर किंवा त्यापेक्षा कमी खोलीच्या पर्जन्य वाहिन्या साफ करण्यासाठी केला जातो.
 
 
पर्जन्य जलवाहिन्यातील १०० मिमी पर्यंतच्या वस्तू सहजपणे खेचून घेण्यासाठी व पाण्याच्या दाबाच्या साहाय्याने पर्जन्य जलवाहिन्या साफ गाळ विरहित करण्यासाठी वाहनांवर बसविलेले रिसायकलिंगची सुविधा असलेली नवीन यंत्रणा खरेदी करण्यात येणार आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@