महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |



नाशिक : महाराष्ट्र राज्याच्या ५८ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त पोलीस संचलन मैदान येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री महाजन यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शानदार संचलनाने राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. संचलनाचे नेतृत्व सहायक पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांनी केले.

संचलनात महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी, पोलीस आुयक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, गृहरक्षक दल, वन विभाग, अग्निशमन दल, शहर वाहतूक शाखेच्या पथकांनी सहभाग घेतला.जलद प्रतिसाद पथक, पर्यटन पोलीस, दंगा नियंत्रण पथक, वज्र, वरुण, वन्य प्राणी बचाव पथक, आपत्ती व्यवस्थापनाचे देवदूत, १०८ रुग्णवाहिका आदी वाहनांचाही संचलनात सहभाग होता. चित्ररथांच्या माध्यमातून मतदार नोंदणी आणि रस्ता सुरक्षेचा संदेश यावेळी देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात देखील ‘महाराष्ट्र दिन’ साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नाशिक उपविभागातील तलाठी व्ही. एस. काळे यांना उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने गौरविण्यात आले. ’शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजने’अंतर्गत वीरपत्नी कमल वसंत लहाने, कांचन सुरेंद्र नवगिरे, रेखा एकनाथ खैरनार आणि सुरेखा सुरेश सोनवणे यांना स्मार्टकार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, विभाग नियंत्रक नितीन मैंद, विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिया, तहसीलदार सी.एस. देशमुख आदीमंडळी यावेळी उपस्थित होते. .

@@AUTHORINFO_V1@@