जिल्ह्याकडे यंदा साडे बारा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2018
Total Views |



वाशीम : राज्य शासनाकडून प्रतिवर्षी राबवण्यात येणाऱ्या राज्यव्यापी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यंदा वाशीम जिल्ह्याला १२ लाख ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून जिल्ह्यातील वृक्षांची संख्या वाढवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित वृक्ष लागवड मोहीम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

वाशिम जिल्ह्याला १२ लक्ष ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्हा प्रशासनाने एकूण १३ लक्ष ८८ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. सर्व शासकीय विभागांनी ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार खड्डे खोदण्याची व त्याबाबतची माहिती सादर करण्याची कार्यवाही तातडीने करावी. जिल्ह्यात वृक्षांची संख्या अतिशय कमी आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
@@AUTHORINFO_V1@@