नरेंद्र मोदी आजपासून इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांसोबत संबंध चांगले तसेच घट्ट करण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदी या देशांची भेट घेणार आहे. या दौऱ्यामुळे नक्कीच या देशांशी संबंध घट्ट होतील असे नरेंद्र मोदी यांचे मत आहे. आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध वाढावे या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दौरा करणार आहेत. 
 
 
 
 
२९ मे ते २ जूनपर्यंत हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात नरेंद्र मोदी प्रथम इंडोनेशिया देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत, येथे ते इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको यांची भेट घेतील. यावेळी नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या सांस्कृतिक शैलीची ओळख करून घेतील. इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या जवानांना नरेंद्र मोदी यावेळी श्रद्धांजली अर्पण करतील. तसेच ते यावेळी राष्ट्रीय संग्रहालय याला देखील भेट देतील आणि तेथे उद्घाटन करतील. 
 
 
 
 
यानंतर नरेंद्र मोदी मलेशियाच्या दौऱ्यावर रवाना होतील. या दौऱ्यात ते मलेशियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान महादेव मोहम्मद यांची भेट घेतील. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी सिंगापूरला भेट देणार असून येथे ते देशातील उच्च क्रमांकाचे २० सीईओ यांची भेट घेतील. येथे ते भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जे नवीन मार्ग खुले होतात त्यावर चर्चा करतील. सिंगापूरचा हा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा दौरा असणार आहे. यात ते परराष्ट्र संबंध यावर चर्चा करतील तसेच भारतात गुंतवणूक वाढावी याबद्दल प्रयत्न करतील. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@