मोसमी पाऊस आज सायंकाळपर्यंत केरळमध्ये दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
केरळ : गेल्या कित्येक दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या सगळ्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मोसमी पाऊस आज सायंकाळपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी ही माहिती दिली. केरळमध्ये सध्या पावसाळासदृष्य स्थिती असली तरी, मोसमी पावसाचे काही निकष अद्याप पूर्ण झालेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. 
 
 
 
दरम्यान, पुढच्या ३६ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या मराठवाड्यात काही भागात पाऊस सुरु झाला आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातही तुळजापूर, परंडा भागात काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. 
 
 
 
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या गिरगाव येथे पावसामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@