उत्तरपत्रिकेची ‘फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकना’साठी आता थेट विद्यापीठाकडे अर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2018
Total Views |

विद्यार्थ्यांचा किमान दहा दिवसांचा वेळ वाचणार

 

 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध परीक्षांनंतर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी (फोटोकॉपी) व पुनर्मूल्यांकनासाठी (रिव्हॅल्युएशन) आता विद्यार्थी महाविद्यालयांऐवजी थेट विद्यापीठाकडे अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून, दोन्ही गोष्टींसाठी एकूण किमान दहा दिवसांचा वेळ वाचणार आहे. या सुविधेमुळे विद्यार्थीचा वेळ वाचावा यासाठी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी यासंबंधी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने थेट विद्यापीठाकडे अर्ज सादर करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
 
विद्यापीठाच्या माध्यमामधून दरवर्षी सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षा देतात. यानंतर या विद्यार्थ्यांपैकी काही हजार विद्यार्थी फोटोकॉपी व नंतर पुन: मूल्यांकनासाठी अर्ज करतात. या वर्षी हे विद्यार्थी यासंदर्भात थेट विद्यापीठाकडे अर्ज करु शकणार आहेत. याशिवाय, यासाठी आवश्यक असणारे शुल्कही आता ऑनलाईन भरता येणार आहे. याआधी, यासंदर्भातील अर्ज हे महाविद्यालयांकडे करण्यात येत असत. संबंधित महाविद्यालयांकडून पाच दिवसांनी हे अर्ज एकत्रितपणे विद्यापीठाकडे पाठविले जात. आता महाविद्यालयांकडे अर्ज करण्याचा टप्पा वगळण्यात आल्याने तसेच, ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्यामुळे दोन्ही गोष्टींसाठीचे प्रत्येकी पाच-पाच दिवस वाचणार आहेत. याशिवाय, महाविद्यालये व विद्यार्थ्याचे कष्टही यामधून वाचणार आहेत. या नव्या सुधारणांमुळे उत्तरपत्रिकेची प्रत (फोटोकॉपी) व पुनर्मूल्यांकनाचा (रिव्हॅल्युएशन) निकाल किमान १० दिवस आधी मिळणे शक्य होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली.
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन
 
ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अथवा विद्यापीठात जाण्याची आवश्यकता नाही. विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर परीक्षा - उत्तरपत्रिकेची फेरतपासणी व पुनर्मूल्यांकन या लिंकवर गेल्यानंतर यासंबधीची सर्व माहिती व परिपत्रक उपलब्ध आहे. ही प्रक्रिया मार्च / एप्रिल २०१८ च्या परीक्षांच्या निकालापासून लागू करण्यात आली आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@