नाशिक जिल्ह्यातील तालुके रोजगारयुक्त होणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2018
Total Views |

१३ जिल्ह्यांतील २७ तालुक्यांत विशेष योजना

 
 
 
 
नाशिक : मानव विकास कार्यक्रमांतर्गत मानव विकास निर्देशांकात समाविष्ट असलेल्या १३ जिल्ह्यांतील २७ तालुक्यांत रोजगारनिर्मितीसाठी एक विशेष योजना राबविण्याचा शासनाचा मानस असून याच माध्यमातून हे तालुके रोजगारयुक्त तालुके करण्यात येणार आहेत.
 
या शासनाच्या निर्णयामुळे आता तालुक्यात रोजगारनिर्मिती होऊन बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात मानव विकास कार्यक्रम ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या २३ जिल्ह्यांतील १२५ तालुक्यांत राबविण्यात येत आहे. नुकत्याच राज्यात सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय भाषणात वित्तनियोजन मंत्र्यांनी मानव विकास निर्देशांकात समाविष्ट असलेल्या १२५ तालुक्यांपैकी २५ तालुक्यांत रोजगार निर्मितीसाठी एक विशेष योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेतून त्या-त्या तालुक्यातील बेरोजगारांना कौशल विकास व रोजगार निर्मितीविषयक योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
 
यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या १३ जिल्ह्यांतील निवडक २७ तालुक्यांत कौशल विकास रोजगार निर्मिती होण्याचे उद्देश साध्य करण्याकरिता संयुक्त राष्ट्र यांच्या सहकार्याने ‘अ‍ॅक्शन रूम टू रिड्युस पॉवर्टी’ या नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
 
निवडलेल्या तालुक्यांतील भौगोलिक, आर्थिक तसेच सामाजिक परिस्थिती विचारात घेऊन जास्तीत जास्त लोकांचा कौशल विकास करून रोजगारनिर्मिती होईल, अशा विशेष योजना संबंधित जिल्हाधिकारी यांनी तालुका स्तरावर अमलात आणावयाच्या दृष्टीने ३० जूनपर्यंत तयार करून त्यांचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करावेत. त्यांनतर विभागीय आयुक्तांनी त्यांच्या शिफारशीसह असा प्रस्ताव मानव विकास यांच्याकडे १५ जुलैपर्यंत अंतिम मंजुरीसाठी सादर करावयाचा आहे. मानव विकास आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडून प्राप्त अहवाल विभागीय आयुक्तांच्या शिफारशीप्रमाणे ३१ जुलैपर्यंत अंतिम मंजुरी देऊन जिल्हानिहाय निधी उपलब्ध करून द्यावा, असे या निर्णयात म्हटले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@