यंदा जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे नियोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |


यवतमाळ : रेशीम उद्योगासाठी अनुकूल वातावरणामुळे यंदा जिल्ह्यामध्ये दोन हजार एकरवर रेशीम लागवड करण्यात येणार असल्याचे माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी आज दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात रेशीम विकास आढावाबाबत आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली असून यासंबंधीचे सर्व नियोजन पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. .


जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चांगली मागणी आहे असून तुतीच्या लागवडीकरीता जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहे. रेशीम लागवडीकरीता जिल्ह्यातील १ हजार ६०० शेतक-यांनी पुढाकार घेतला असून यापैकी १ हजार २५० शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती येरावार यांनी यावेळी दिली. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, वन विभाग, सहकार, जिल्हा रेशीम कार्यालय यांच्या समन्वयातून २ हजार एकरवर नियोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील बेंबळा, निळोणा, चापडोह व इतर धरणे तसेच तलावांच्या बाजुला असलेल्या जमिनीवर तुतीची चांगली लागवड होऊ शकते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्जाच्या यादीत रेशीम लागवड या पिकाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीमधूनसुध्दा निधी उपलब्ध करून दिला जाईल. कौशल्य विकास योजनेतून रेशीम लागवड प्रशिक्षण देण्याचा मानस आहे, असे त्यांनी या बैठकीत सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@