मतदारांची पाठ आणि इव्हीएमचा घोळ ; मावळत्या उत्साहासह मतदान संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |



भंडारा : पालघर आणि भंडारा लोकसभा जागांसाठी घेण्यात आलेले मतदान अखेरकार समाप्त झाले आहे. इव्हीएम मशीन्सचा घोळ आणि मतदारांचा अत्यंत अल्प प्रतिसादामुळे दिवसाबरोबरच अत्यंत मावळत्या उत्साहासह हे मतदान पार पडले असून दोन्ही जागांसाठी मिळून सरासरी २५ ते ३० टक्क्यांच्या दरम्यानच मतदान झाले असल्याचे समोर आले आहे.

पालघर आणि भंडारा-गोंदिया या दोन लोकसभा जागांसाठी आज मतदान घेण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजल्यापासून या दोन्ही ठिकाणी मतदान सुरु करण्यात आले होते. परंतु थोड्याच वेळात भंडारा-गोंदियामध्ये काही ठिकाणी वीज गेल्यामुळे आणि इव्हीएम मशीनच खराब झाल्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला. भंडारा-गोंदिया मतदारसंघामधील तब्बल २५ टक्के इव्हीएम मशीन्स खराब झाल्यामुळे बराच काळ मतदान खोळंबले होते. परंतु निवडणूक आयोगाने यावर तातडीने उपाय करत मतदान पूर्ववत् सुरु केले. यामुळे दिवसअखेरपर्यंत भंडारामध्ये ३१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. दरम्यान पालघरमध्ये मतदारांनीच मतदानाकडे पाठ फिरवल्यामुळे पालघरमध्ये ३० टक्क्यांच्या आसपासच मतदान झाले आहे.

दरम्यान इव्हीएम मशीन्स खराब झाल्यामुळे विरोधकांनी भाजप थेट टीका करण्यास, तर निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण करण्यास सुरुवात केली होती. काही विरोधकांनी तर मशीन्स खराब झालेल्या केंद्रांवरील निवडणुका रद्द करण्यात आल्याची आवई उठवली. त्यामुळे यंत्रेखराब झालेल्या ठिकाणी बॅलेट पेपरच्या सहाय्याने फेरमतदान घेण्याची मागणी विरोधकांनी करण्यास सुरुवात केली होती. परंतु निवडणूक आयोगाने याला उत्तर देत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातल्या कोणत्याही मतदान केंद्रावरचे मतदान रद्द करण्यात आलेले नाही, तसेच खराब झालेले यंत्र हे अर्ध्या तासांच्या आत बदलले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणीही शंका घेऊ नये, असे आयोगाने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@