मान्सूनराजाचे केरळमध्ये आगमन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |

दोन दिवसांपासून दक्षिण भारतात मुसळधार पावसाला सुरुवात

राज्यात देखील काही ठिकाणी पावसाची हजेरी 




बंगालच्या उपसागरामधून अत्यंत वेगाने भारताच्या दिशेने येत असलेल्या मान्सून राजाचे अखेरकार केरळमध्ये आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून केरळ आणि दक्षिण भारतामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून मान्सूनच्या आगमनाचे सर्वं मापदंड लवकरच पूर्ण होण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती स्कायमेट या संस्थेनी दिली आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून मान्सूनच्या आगमनाचे सर्व मापदंड पूर्ण होत असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्येच मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असे हवामान खात्याने आज सांगितले आहे.

 
मान्सूनच्या आगमनाची माहिती घोळा करण्यासाठी दक्षिण भारतामध्ये उभारण्यात आलेल्या हवामान खात्यांच्या चौदा केंद्रांजवळील परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याचे स्कायमेटने सांगितले. याविषयी आकडेवारी देखील स्कायमेटने जाहीर केले असून या सर्व केंद्रांवर १० मिमीपेक्षा जास्त पाऊस जास्त पाऊस झाल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग देखील तशी २५ ते ३० किमी इतका नोंदवला गेला असून ओएलआरचे प्रमाण देखील सध्या १६० wm इतके आहे. त्यामुळे उद्यापर्यंत मान्सूनचे पूर्णपणे केरळमध्ये आगमन होईल, असा अंदाज स्कायमेट वर्तवला आहे.
 




राज्यात देखील अनेक ठिकाणी पाऊसाची हजेरी 

दरम्यान राज्यामध्ये देखील काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. सांगली, सातारा कोल्हापूरसह लातूर आणि मराठवाड्याच्या काही काही भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यातील लातूरमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून वीज कोसळून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आलेले आहे. तसेच पावसामुळे राज्यातील काही भागातील वातावरणामधील उष्णता देखील कमी झाली आहे.

 
मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा करण्यासाठी भारतीय हवामान खात्याने काही मापदंड ठरवलेले आहेत. यामध्ये पावसाचे प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि आउटगोइंग लॉंगवेब रेडिएशन अर्थात ओएलआर यांचे प्रमाण तपासले जाते. सलग दोन दिवस केरळमधील केंद्रांजवळ २.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यास तसेच वाऱ्याचा वेग ताशी २८ ते ३८ किमी झाल्यास आणि  ओएलआरचे  अ प्रमाण २०० wm झाल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी हवामान खात्याकडून मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली जाते. त्यामुळे स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजप्रमाणे आणि दिलेल्या माहितीनुसार यंदा लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याचे दिसत आहे. 
@@AUTHORINFO_V1@@