कुमारस्वामींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |


नवी दिल्ली : कर्नाटक राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात त्यांनी आज ही भेट घेतली, तसेच पंतप्रधानांना काही भेटवस्तू देखील त्यांनी यावेळी दिल्या.

पूर्वनियोजित वेळेनुसार कुमारस्वामी हे आज पंतप्रधानांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचली. यावेळी स्वतः पंतप्रधान मोदी यांनी कुमारस्वामी यांचे स्वागत केले. यावेळी कुमारस्वामी यांनी पंतप्रधानांना काही भेटवस्तू देऊन त्यांच्या स्वागताचा स्वीकारला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास संभाषण झाले. यावेळी कर्नाटकातील विजयासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींना कुमारस्वामी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच काही विषयांवर त्यांची चर्चा केली.

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच कुमारस्वामी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. आज सकाळपासून कुमारस्वामी हे नवी दिल्ली येथे आलेले आहेत. आपल्या या एकदिवसीय दौऱ्यामध्ये नवी दिल्लीतील अनेक वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे. तसेच त्यांच्याशी राजकीय चर्चा केली आहे. दरम्यान त्यांच्या नुकत्याच कॉंग्रेससंबंधी विधानावरून विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर जोरदार टीका देखील सुरु आहे.
@@AUTHORINFO_V1@@