आम्ही काँग्रेसच्या दयेखाली आहोत : कुमारस्वामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |

त्यांच्या परवानगी शिवाय कुठलाही निर्णय शक्य नाही

बंगळुरु : कर्नाटकच्या निवडणूकीत आम्ही पूर्ण जनसमर्थनाची अपेक्षा ठेवली होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आम्हाला काँग्रेसची साथ द्यावी लागली. आता आम्ही त्यांच्या दयेखाली आहोत, त्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही मोठा निर्णय घेणे शक्य नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक येथील नवनिर्वाचित मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले. आज पत्रकारांशी संवाद साधताना ते त्यांनी हे वक्तव्य केले.
 
 
 
 
मी राज्यातील साडे ६ कोटी लोकांच्या दबावाखाली नाहीये. मात्र आज मी काँग्रेसच्या दयेखाली आहे. एक राजकीय नेता म्हणून माझ्या काही अडचणी आहेत, मात्र मी एक मुख्यमंत्री म्हणून माझ्या सर्व जबाबदाऱ्या नक्की पार पाडेन, असे देखील ते यावेळी म्हणाले.
शेतकरी कर्जमाफी माझे पहिले लक्ष्य :

शेतकऱ्यांची कर्जमाफी हे माझे पहिले लक्ष्य असणार आहे, कारण मी त्यांना तसे आश्वासन दिले होते. जर मी हे करण्यास असमर्थ ठरलो तर मी राजीनामा देईन, असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@