जागतिकीकरण आणि माध्यम मालकी समूह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |
 
 
 
जगातील माध्यमांचा विकास किंवा जगातील माध्यमांची सद्यस्थिती असं आपण ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी जगातील एकूण मानवी समाजातील विकासाची दशा आणि दिशा यांच्यात बरेचसे घटनात्मक बदल झाले आणि समाजात व्यापाराच्या दृष्टीने अधिकार गाजविणे यासाठी या उदारमतवादी राजकारणाचा वापर करण्यात आला किंवा जगातील राजकारणात त्याला महत्त्वाचं स्थान मिळाले. मात्र, त्याचबरोबर आपण ज्या समाजात राहतो, त्याला ‘माहितीचा समाज’ असे म्हणतो आणि त्यात माध्यमांची भूमिका ही केंद्रीय आहे. १९८० च्या दशकात काही मुख्य घटना राजकारणातील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील तर त्यांच्यामध्ये इतके बदल झाले की संपूर्ण जगाची परिस्थिती बदलली.
 
१९९० च्या आर्थिक उदारीकरणानंतर रशियाच्या तुकड्यानंतर किंवा साम्यवादाच्या पराभवानंतर संपूर्ण जगात माध्यम क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. वैश्विकीकरणाच्या प्रक्रियेचा प्रभाव माध्यमांवर, माध्यम संस्कृतीवर झाला आणि ते परस्परपूरक ठरले. म्हणजे, माध्यमांमुळे इतर देशांची संस्कृती रुजली आणि ही संस्कृती रुजल्याने इतर देशांची स्वीकारार्हता वाढली. म्हणजेच, उदारीकरणामुळे सॅटेलाईट टीव्ही आपल्याकडे आले. त्यामुळे अमेरिकेतील सीएनएन, युकेचे बीबीसी हे चॅनेल भारतात दाखल झाले आणि ते चॅनेल इथे आल्यामुळे त्यांच्या संस्कृतीचे दर्शन भारतात होऊ लागले. थोडंफार असंही आपण म्हणू शकतो की, यात भांडवलशाही वाढली आणि भांडवलशाही वाढल्यामुळे चंगळवाद बळावला आणि माध्यमांमध्ये सेवा जाऊन, त्यांना व्यवसायिक स्वरूप प्राप्त झाले. परिणामी, व्यवसायाप्रमाणे या क्षेत्रातही सौदेबाजी सुरु झाली. मोठमोठ्या माध्यम समूहांनी छोट्या माध्यम समूहांना गिळंकृत केले, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. या मोठमोठ्या माध्यमांत ही संस्कृती कुठून येते हे जर पाहिलं तर अमेरिका आणि युरोपचं उदाहरण आपण घेऊ शकतो. संपूर्ण वैश्विक माध्यमांवर अमेरिका आणि युरोपचा प्रभाव पडतो, असं म्हणता येईल. मॅकब्राईड आयोगाने त्यांच्या अहवालात विकसनशील देशांतील अविकसित माध्यमांची स्थिती मांडली होती. पण, संचार क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जे काही बदल झाले, त्यामुळे आता मॅकब्राईड आयोगाच्या सूचना तितक्या महत्त्वाच्या राहिल्या नाहीत. पण, ‘माध्यमांची मालकी’ ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी अजूनही अमेरिकेचं, कॅनडाचं, युरोपचं प्रभुत्व दिसून येतं आणि तुलनेने लॅटिन अमेरिकन देश, दक्षिण आफ्रिका, आशियाई देश येथील माध्यमे अजूनही मागासलेली दिसतात किंवा विकसित होत आहेत. माध्यमांचं व्यापारीकरण म्हणून याकडे बघणं किंवा व्यापारीकरणातून बाजार करणं, हे मुळात अमेरिकेतून आलं आणि त्यामुळेच माध्यमांचं व्यापारीकरण भारतातही झालं, असं आपण म्हणू शकतो.
 
मार्शल मॅकलुहान म्हणतात तसे, जगाचे रूपांतर खेड्यात झाले. मात्र, त्याखेरीज माध्यमांच्या सत्तेचं, मालकीचं केंद्रीकरण खूप मोठ्या प्रमाणावर चालले आहे आणि अशी बरीचशी उदाहरणं आपण घेऊ शकतो. ईटीव्ही या इतक्या मोठ्या माध्यम समूहाला वायाकॉम-१८ ने खरेदी केले. त्यानंतर वायाकॉम-१८ ला रिलायन्सने खरेदी केले किंवा अनेक छोटी-मोठी जिल्हास्तरीय वृत्तपत्रे बंद पडली. दैनिक भास्कर, दैनिक जागरण, टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात विदेशी गुंतवणूक झाली. संपूर्ण जगातील माध्यम क्षेत्राचा आपण विचार करतो, त्यावेळी जगातील ८० टक्के माध्यमांवर १० मोठ्या माध्यमसमूहांचे प्रभुत्व आहे. माध्यम हा एक उद्योग झाला आहे. एक सांस्कृतिक, वैचारिक उद्योग झाला आहे. त्याचे नफ्यावर आधारित संचलन केले जाते, त्याचे बाजारीकरण झाले आहे. त्यामुळे यातील गंभीरता, समाजसेवा जाऊन, बाजारूपणा यात आला असं आपण म्हणू शकतो.
 
जगातील मोठे माध्यम समूह याबद्दल आपण ज्यावेळी बोलतो, त्यावेळी ‘मीडिया मुघल’ ज्याला म्हटले जाते, ती रूपर्ट मर्डोक यांच्या मालकीचे ‘स्टार इंडिया’ जे आजही आपल्याकडे आहे. (याचेही अधिकरण लवकरच होणार असं म्हटलं जातं डिझने ते विकत घेईल असे म्हणतात, पण अजून तरी ते झालेले नाही.)
 
रूपर्ट मर्डोक यांच्या न्यूज कॉर्पोरेशनचे अमेरिका, कॅनडा, आशिया, ऑस्ट्रेलिया, लॅटिन देश यात खूप मोठं स्वामित्व दिसतं किंवा याखेरीज जगातील मोठ्या माध्यम समूहात जर्मनीतील बरटेसलमन याच्या ५३ वेगवेगळ्या देशात सहाशे कंपन्या आहेत किंवा अमेरिकेतील टाईम, वॉर्नर, सोनी जे आधी फक्त इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात होते, ते आता माध्यम बाजारपेठेत आले. त्यांनी सोनी, इएसपीएन आणि जवळपास हजार सहयोगी कंपन्या त्यांच्या आहेत. त्याखेरीज सीएनबीसी किंवा एनबीसी यांनी सुद्धा वेगवेगळे वायाकॉम-१८, टीव्ही-१८ असे दिसते. नंतर युनिव्हर्सल हे खूप मोठे मीडिया हाऊस आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, याहू, फेसबुक अशी वेगवेगळी माध्यम आहेत आणि ते कसे काम करते हे आपल्याला ठाऊक आहेच. आपल्याला माहितच आहे की, फेसबुक सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे किंवा गुगल आणि युट्यूबच्या द्वारे करार आहे. आपल्याकडे याहू जागरण आहे, याहू मायक्रोसॉफ्ट आहे, तर असे खूप मोठे करार माध्यम जगतात दिसतात आणि संपूर्णतः उद्योग क्षेत्र प्राप्त झाल्यामुळे रेडिओ, टीव्ही, मुद्रित माध्यम हे सर्व यात मोडतात. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या यात सामील आहेत आणि बर्‍याचशा कंपन्या वेगवेगळ्या देशात स्वतः पोहोचल्या आहेत किंवा भागीदारीत कार्य सुरु केले आहे आणि यामुळे विविधता संपते आणि बातम्यासुद्धा एखाद्या उत्पादनासारख्या दिल्या जातात. ‘बातम्यांचे मर्डोकीकरण’ असा छान शब्द वापरण्यात येतो. यात सगळ्या बातम्या उत्पादनासारख्या केल्या जातात. मग त्यात राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक यांच्यात सुद्धा मनोरंजन करून ठेवले जाते. इन्फोटेनमेंट हा नवीन प्रकार आला. याद्वारे लोकांना मनोरंजनाच्या नादाला लावायचं किंवा celebrity, lifestyle, metro ~mOma, fashion trends, technosavy products बाजारात आणणे अशा गोष्टींबद्दल या लेखात लिहिले होते.
 
सारांश काय तर मोठमोठ्या माध्यम समूहांनी जगातील माध्यम व्यवस्था काबीज केली आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे, सोशल मीडियामुळे, नागरिक पत्रकारितेमुळे आंतरक्रिया वाढली तरी माध्यमांची मालकी विशिष्ट समूहाकडे असल्यानंतर अजेंडा सेटिंग, फ्रेमिंग या गोष्टी होणार किंवा मालकाच्या इच्छेने चालणार किंवा नोम चॉमस्की यांचा गाळणीचा सिद्धांत आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे माध्यमांवर वर्चस्व हे शासनाचे, जाहिरातदारांचे, भांडवलदारांचे आहे हे नक्कीच आपण म्हणू शकतो.
 
 
 
 
- प्रा. गजेंद्र देवडा

 
 
@@AUTHORINFO_V1@@