ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीची तयारी सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |




वॉशिंग्टन डी.सी. :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरिया हुकुमशाह किम जोंग उन यांच्या प्रस्तावित भेटीची तयारी सुरु झाली असून या द्विपक्षीप बैठकीच्या तयारीसाठी अमेरिकेचे एक शिष्टमंडळ उत्तर कोरियामध्ये पोहोचल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

ट्रम्प यांनी स्वतः याविषयी ट्वीट करून माहिती दिली आहे. किम जोंग उन हा आपल्या मतांशी सहमत असून त्याची भेटी घेण्यासाठी म्हणून अमेरिका उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच याभेटीची तयारी करण्यासाठी म्हणून अमेरिकेचे एक शिष्टमंडळ उत्तर कोरियाला पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर उत्तर कोरियामध्ये प्रचंड क्षमता असून हा देश भविष्यामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत उत्तम कामगिरी करू शकतो, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.




येत्या १२ जूनला डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची सिंगापूर येथे भेट होणार होती. परंतु गेल्या आठवड्यामध्ये किम जोंग उन याच्या एका वक्तव्यावरून अमेरिकेने ही भेट रद्द केली होती. पण त्यानंतर किम जोंग उन यावर घेतलेल्या सकारत्मक पावित्र्यानंतर अमेरिकेने देखील आपली नाराजी सोडत भेट घेण्याची तयारी दर्शवली.
@@AUTHORINFO_V1@@