नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
केरळ : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडूतल्या काही भागात मोसमी पाऊस पोचण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत दक्षिण कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असे सांगण्यात येत आहे. 
 
 
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. त्यामुळे आता इतके दिवस पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराज्याला आनंदाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. ४८ ते ५० तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल होण्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार महाराष्ट्रमध्ये २ ते ३ जून या तारखेला पाऊस पडण्यास सुरुवात होईल असा अंदाच हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. 
 
 
उन्हाच्या चटक्याने भाजलेला महारष्ट्र आता लवकरच सुखावणार आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, वर्धा, अमरावती हे जिल्हे सगळ्यात जास्त प्रमाणात मान्सूनची वाट पाहत आहेत. मागील वर्षी विदर्भात कमी पाऊस झाल्याने यावर्षी पाऊस कसा पडतो याकडे सगळ्या जनतेचे लक्ष लागले आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@