स्टरलाईट कंपनीला अखेर टाळं

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |



तूतुकुडी : गेल्या काही दिवसांपासून चर्चा विषय बनलेल्या तूतुकुडी येथील वेदांता स्टरलाईट कॉपर प्लान्ट या कंपनीला अखेरकार टाळे लावण्याचे आदेश तामिळनाडू सरकारने दिले आहेत. कंपनीविरोधातील निदर्शनावर झालेल्या गोळीबारात झालेल्या १३ नागरिकांच्या मृत्यूनंतर हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांच्या मागणीनंतर आणि पर्यावरणाची हानी होत कारणाने कंपनी बंद करत असल्याची नोटीस तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण बोर्डने कंपनीला पाठवली आहे.

आज बोर्डने ही नोटीस कंपनीला पाठवली असून या कंपनीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे बोर्डने म्हटले आहे. याचबरोबर नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीनंतर बोर्डने हा निर्णय घेतला असून हा प्लान्ट कायमस्वरूपी बंद करण्यात येत असल्याचे बोर्डने म्हटले आहे. या आदेशाची एक प्रत बोर्डने कंपनीच्या गेटवर देखील चिकटवली असून कंपनीचे मालकी हक्क असलेल्या वेदांता ग्रुपला देखील याविषयी नोटीस पाठवण्यात आली आहे.

तूतुकुडी येथील या कंपनीमुळे आजुबाजू परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत असल्याची तक्रार गेली अनेक वर्ष येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. परंतु प्रशासनाकडून मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. अखेरकार नागरिकांनी याविरोधात आवाज उठवत कंपनीविरोधात आंदोलन आणि निदर्शने करण्यास सुरुवात केली. नागरिकांचा प्रचंड मोठा जमाव कंपनीकडे जात येत असल्याचे पाहून पोलिसांनी या जमावावर गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये एकूण १३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशपातळीवर याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. तसेच या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती.
@@AUTHORINFO_V1@@