पालिका आयुक्त करणार नालेसफाईची पाहणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |



ठाणे : येत्या काही दिवसांत मान्सूनला सुरुवात होणार असून कोणत्याही परिस्थितीत एका आठवड्यात नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश देतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारपासून मी स्वत: नालेसफाईच्या कामाची पाहणी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान खाली करण्यात आलेल्या अतिधोकादायक इमारती तातडीने तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले.

आज सकाळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे मान्सूनपूर्व करावयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त-१ सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त २ समीर उन्हाळे आदी उपस्थित होतेया बैठकीत जयस्वाल यांनी पावसाळा तोंडावर आला असून शहरातील नालेसफाईची कामे तातडीने एका आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश देऊन येत्या बुधवारपासून नालेसफाईच्या कामाची पाहणी करणार असल्याचे या बैठकीत सांगितले. त्याचप्रमाणे रस्त्यातील खड्डे बुजविणे, चेंबर कव्हर बसविणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या.

शहरात ज्या ठिकाणी पाणी पुरवठा, मलनिस्सारण विभागाची कामे सुरू असतील, त्या ठिकाणी सर्वतोपरी सुरक्षा घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या. विजेचा धक्का लागून, चेंबर उघडी राहिल्याने किंवा पावसाळ्यात वाहून जावून जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेप्रभागनिहाय अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेताना जयस्वाल यांनी सी १संवर्गातील खाली केलेल्या एकूण ७७ इमारती तोडण्याची कारवाई तातडीने सुरू करावी तसेच उर्वरित १८ इमारती तात्काळ खाली करून तोडण्यात याव्यात, असे आदेश त्यांनी सर्व सहायक आयुक्तांनी दिले. याबाबत कुठलीही हयगय खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला. सद्यस्थितीत कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने शहरातील सर्व अनधिकृत फलक आणि बॅनरवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अतिक्रमण विभाग आणि सर्व सहायक आयुक्तांना दिले.

@@AUTHORINFO_V1@@