आपच्या आणखी एका नेत्याचा माफीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |

कुमार विश्वास यांनी मागितली अरुण जेटली यांची मागणी


नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आम आदमी पक्षाकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंबंधी आप नेते कुमार विश्वास यांनी आज जेटली यांची माफी मागितली आहे. विश्वास यांनी पत्र लिहून जेटली यांची माफी मागितली असून जेटली यांनी देखील कुमार यांचा माफीनामा मान्य केला आहे.

'आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यानंतर सर्वांनी केजरीवाल यांची पक्ष नेता म्हणून नियुक्ती केली. यावेळी सर्व पक्षांप्रमाणेच आपमध्ये देखील केजरीवाल जे काही सांगत त्यावर सर्व कार्यकर्ते हे डोळे झाकून विश्वास ठेवत होते. परंतु त्यानंतर मात्र केजरीवाल हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून अनेक नेत्यांवर पुराव्यांशिवाय उघडउघड आरोप करू लागले. त्यावेळी मी स्वतः अरविंदला या विषयी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने आपण पुराव्यांशिवाय बोलत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर विश्वास ठेवत होते. पण त्यानंतर न्यायालयीन चौकशीमध्ये अरविंदचा खोटारडेपणा उघड झाल्यानंतर मात्र त्याने आपली खुर्ची वाचवण्यासाठी सर्व नेत्यांची माफी मागण्यास सुरुवात केली. परंतु या दरम्यान त्याने एकदा देखील आपल्या एकही कार्यकर्त्याला अथवा पक्षातील नेत्याला विश्वसात घेतले नाही. उलट कार्यकर्त्यांचाच घात करून आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी म्हणून त्याने वेगळेच प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे यासंबंधी आम्ही सर्वजण तुमची दिलगिरी व्यक्त करत असून तुमची माफी मागत आहोत' असे कुमार यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.


आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी एका प्रचारसभेमध्ये जेटली यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. केजरीवाल यांच्या आरोपांविरोधात जेटली यांनी थेट न्यायालयात धाव घेत, केजरीवाल यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. यानंतर न्यायालयाच्या चौकशीमध्ये केजरीवाल यांच्या आरोपांमधील खोटारडेपणा बाहेर आल्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर लगेच केजरीवाल यांनी आपल्याच वक्तव्यावरून 'यु-टर्न' घेत जेटली यांची माफी मागितली होती.
@@AUTHORINFO_V1@@