सावरकरांचा एवढा द्वेष कशासाठी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |
 

 
 
लालबहादूर शास्त्री यांच्या काळात आपल्या सैन्याने पाकिस्तानात धडक मारली होती, तेव्हा सावरकरांची अखंड भारताची आशा पुनश्‍च जागृत झाली होती. आपणच आपल्या देशातील राष्ट्रपुरुषांचा अनादर करीत असू- तोही शत्रुराष्ट्रात जाऊन- तर आपल्यासारखे अभागी आपणच! शत्रुराष्ट्रात असताना आपण पक्षभेद विसरून आपल्या देशातील नेत्यांचे गुणगान करायला हवे. परंतु, व्होट बँकेसाठी लांगूलचालन करणार्‍या नेत्यांची मांदियाळीच आपल्या देशात आहे आणि डावे, उजवे यातच आपली ऊर्जा नष्ट करीत असून इतर देश विकासाचे उच्चांक स्थापित करीत आहेत.
 
मणिशंकर अय्यर यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘हिंदुत्व’ हा शब्द सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात सर्वप्रथम वापरला, तो कोणत्याही भारतीय धर्मग्रंथात नाही. मग मणिशंकर अय्यर यांनी हेसुद्धा सांगावे की धर्मनिरपेक्ष हा शब्द कुठून आला आहे? त्याची उत्पती कशी झाली? तो भारतीय धर्मग्रंथात आहे की नाही? हिंदूंच्या मनात तुमच्याच नेत्यांमुळे असुरक्षितता निर्माण झाली होती. यासारख्या गोष्टींमुळे जे या देशातील मूळ नागरिक आहेत, त्यांना डावलून परकीयांचे लांगूलचालन, त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे, प्रसंगी उपोषण करणे यासारख्या गोष्टींमुळे सावरकर व्यथित झाले व त्यांना हिंदुत्वाची भाषा बोलणे गरजेचे झाले.
 
मणिशंकर अय्यर हे कट्टर सावरकरद्वेष्टे आहेत, हे सर्वश्रुतच आहे. सावरकरांनी मुस्लिमांचा जेवढा द्वेष केला नसेल तेवढा मणिशंकर सावरकरांचा द्वेष करतात. काही वर्षांपूवी याच मणिशंकर यांनी, अंदमानातील सावरकरांच्या काव्यपंक्ती पुसल्या होत्या. मणिशंकर अय्यर यांच्यासारख्याच काही नेत्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींकडे, संसदेत सावरकर यांचे तैलचित्र लावू नये अशी मागणीसुद्धा केली होती. मणिशंकर यांनी लाहोरमध्ये जाऊन आपल्याच थोर स्वतंत्रतासेनानीबद्दल ही गरळ ओकली होती. मणिशंकर अय्यर यांना सावरकरांविषयी इतके वैर का आहे, की त्यांनी पाकिस्तानात जाऊन फाळणी सावरकरांमुळे झाली असे बेताल वक्तव्य करावे? हो, सावरकर अंदमानातून सुटून आल्यावर त्यांनी १९२३ साली हिंदुत्त्व शब्द त्यांच्या एका पुस्तकात लिहिला. मणिशंकर अय्यर यांच्या म्हणण्याप्रमाणे हा शब्द कोणत्याही भारतीय धर्मग्रंथात नाही. मग मणिशंकर अय्यर यांनी हेसुद्धा सांगावे की धर्मनिरपेक्ष हा शब्द कुठून आला? त्याची उत्पती कशी झाली? तो भारतीय धर्मग्रंथात आहे की नाही? एकाच देशात दोन प्रकारचे लोक राहतात जे अफगाणिस्तान, इराण येथून भारतात आले त्यांची पितृभू जरी आता भारत असली तरी त्यांची पुण्यभू तिकडेच आहे. अर्थात, त्यांची तीर्थक्षेत्रे तिकडे आहेत. भारतीयांची तीर्थक्षेत्रे भारतातच आहेत म्हणून भारतीयांची पितृभू आणि पुण्यभू भारत हीच आहे. एकाच देशात दोन भिन्न देशांच्या विचारसरणीचे लोक वास्तव्य करीत आहेत या अर्थाने त्यांनी द्विराष्ट्र संकल्पना मांडली होती. मणिशंकर हे सावरकरांना फाळणीबाबत दोषी ठरवत आहेत. परंतु मणिशंकरजी, फाळणीसाठी खरे दोषी कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे. पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा कुणाला होती, इंग्रजांचे फूट पाडण्याचे धोरण, जिन्नांचा गांधीजींकडे हट्ट हे सर्वांना ज्ञात आहे. तेव्हा ज्यांच्याकडून दहशतवाद पोसला जातो, ज्या देशामुळे आपले कित्येक जवान ऐन तारुण्यात हुतात्मा होत आहेत त्या आपल्या शत्रू राष्ट्रात जाऊन काहीही बरळू नका.
 
लालबहादूर शास्त्री यांच्या काळात आपल्या सैन्याने पाकिस्तानात धडक मारली होती, तेव्हा सावरकरांची अखंड भारताची आशा पुनश्‍च जागृत झाली होती. आपणच आपल्या देशातील राष्ट्रपुरुषांचा अनादर करीत असू- तोही शत्रुराष्ट्रात जाऊन- तर आपल्यासारखे अभागी आपणच! शत्रुराष्ट्रात असताना आपण पक्षभेद विसरून आपल्या देशातील नेत्यांचे गुणगान करायला हवे. परंतु, व्होट बँकेसाठी लांगूलचालन करणार्‍या नेत्यांची मांदियाळीच आपल्या देशात आहे आणि डावे, उजवे यातच आपली ऊर्जा नष्ट करीत असून इतर देश विकासाचे उच्चांक स्थापित करीत आहेत. आपण बुलेट ट्रेनचे रूळ उखाडण्याच्या चिथावण्या देत आहोत, प्रांतवाद वाढवीत आहोत, आपल्याच राष्ट्रपुरुषांचा अपमान करीत आहोत. मणिशंकरजी, फाळणीचे खापर सावरकरांवर का ङ्गोडता आहात? होय, त्यांनी हिंदुत्व शब्द निर्मिलाच नव्हे, त्यांना तो निर्माण करावा लागला. कारण तुमच्या नेत्यांकडून हिंदूंना हीन दर्जाची वागणूक देणे सुरू झाले होते, अल्पसंख्यकांचे लांगूलचालन, त्यांच्या मागण्या पूर्ण करणे, त्यांना पाठीशी घालणे सुरू झाले होते. मी चुकीने हिंदू धर्माचा आहे, अशी काहीशी वाक्ये बोलली जाऊ लागली होती. हिंदूंच्या मनात तुमच्याच नेत्यांमुळे असुरक्षितता निर्माण झाली होती. यासारख्या गोष्टींमुळे जे या देशातील मूळ नागरिक आहेत त्यांना डावलून परकीय आक्रमकांच्या वंशजांचे लांगूलचालन, त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे, त्यासाठी प्रसंगी उपोषण करणे यासारख्या गोष्टींमुळे सावरकर व्यथित झाले व त्यांना हिंदुत्वाची भाषा बोलणे गरजेचे झाले. मणिशंकर, आपण विनाकारण द्वेष भावना ठेवू नये. सावरकरांनी ज्या यातना भोगल्या त्यासुद्धा सांगा जरा, देशभक्तांच्या देशभक्तीची तुलना करू नये. परंतु, कुण्या तत्कालीन मुस्लिम लीग वा कॉंग्रेसवाल्यांना तशा यातना भोगाव्या लागल्या काय, तेसुद्धा सांगा व मनात एवढा सावरकरद्वेष ठेवू नका.
 
 
 
 
- विनय विजय वरणगावकर
 
@@AUTHORINFO_V1@@