कोळी महासंघाच्या वतीने उपमहापौर उपेक्षा भोईर यांचा सत्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |



कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नवनिर्वाचित उपमहापौर म्हणून नियुक्ती झालेल्या कोळी महासंघाच्या कल्याण जिल्हा महिला अध्यक्षा व भाजप कल्याण जिल्हा सचिव उपेक्षा भोईर यांची उपमहापौर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल कल्याण लाल चौकी परिसरात कोळी महासंघाच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मांडा, आटाळी, वडवली, मोहाने, गाळेगाव, शहाड, चर्णी, बारावे, वाडेघर, कल्याण, उल्हासनगर, सर्व कोळी समाजबांधवांनी व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून उपमहापौर भोईर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

@@AUTHORINFO_V1@@