जनकपुरी आणि कालकाजीमध्ये आजपासून मेट्रो धावणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |
 

 
 
 
 
नवी दिल्ली : नवी दिल्लीमधील जनकपुरी आणि कालकाजीमध्ये आजपासून मेट्रो धावणार आहे. यामुळे गुरूग्रामपासून नोएडा यांच्यातील अंतर कमी होणार असून दिल्लीकरांना यामुळे खूप दिलासा मिळणार आहे. २५ किलोमीटरच्या या सेक्शनमध्ये २ तासांपेक्षा केवळ ५० मिनिटांमध्ये गुरूग्राम ते नोएडा पोहोचता येणार आहे. आजपासून या नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. 
 
 
त्यामुळे गुरूग्रामच्या नागरिकांना आता नोएडा प्रवास कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे. दिल्लीची लाइफ लाईन मेट्रोला म्हटले जाते. त्यामुळे सामान्य जनतेपासून श्रीमंत जनतेपर्यंत सगळे मेट्रो मधूनच प्रवास करतांना दिसतात. त्यामुळे दिल्ली मेट्रोची 'फ्रिक्वेन्सी' वाढवणे गरजेचे होते. यासाठी जनकपुरी आणि कालकाजी असा प्रवास दिल्ली मेट्रोने सुरु केला असून यामध्ये गुरूग्रामपासून नोएडा केवळ ५० मिनिटांवर येवून पोहोचणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@