भिवंडी महापालिकेस मिळाला स्वच्छतेबाबतचा बहुमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |



भिवंडी ; स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेस देशाच्या सन्मान यादीत पोहोचविणारे पडद्यामागचे सूत्रधार अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड देऊन दिल्ली येथे समारंभपूर्वक गौरव करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या राजीव गांधी प्रतिष्ठानच्या विद्यमाने दरवर्षी देशविदेशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. राजकीय, सामाजिक त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकार्‍यांनाही सन्मानित केले जाते. २१ वर्षांपासून अशा प्रकारच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षीचा सन २०१८ चा ग्लोबल एक्सलन्स अ‍वॉर्ड पुरस्कार ’स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 
स्पर्धेत भिवंडी महापालिकेला देशाच्या सन्मान यादीत पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाचे प्रणेते अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांना दिल्ली येथील मेरिडीयन या पंचतारांकित हॉटेलमध्ये समारंभपूर्वक देण्यात आला. चांदीचे सन्मानचिन्ह आणि मानपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविले.

अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी उल्हासनगर, ठाणे महापालिकेत त्यांनी आपली सेवा बजावली होती. आरोग्य विभागाचा दांडगा अनुभव असल्याने ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत 
स्पर्धेत शहराचे नाव सन्मान यादीत निश्चितपणे आणू,एवढ्या आत्मविश्वासाने तत्कालीन आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना आश्वासन दिले होते. तेव्हापासून आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत नियोजनबद्ध काम करण्याची योजना तयार करून त्याचे तंतोतंत पालन केले. त्यांनी दक्षिण कोरियाच्या एका टीमला बोलावून आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना मार्गदर्शन करून प्रशिक्षणही दिले. आरोग्य निरीक्षकांना ड्रेसकोडही दिला होता. त्या ड्रेसकोडमुळे रहिवाशांवर प्रभावही पडला. स्वत: अतिरिक्त आयुक्त मैदानात उतरल्याने सर्वांनी त्यांना मन:पूर्वक सहकार्य केले.

@@AUTHORINFO_V1@@