शिंदखेडा तालुक्यात ७ पैकी ५ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018
Total Views |

रावलांचा प्रभाव कायमः कुमरेज- परसामळ,साळवे,कंचनपूर,वाघोदे,तावखेडा प्र. बो.चे सरपंचपद जिंकले...

 
शिंदखेडा, २८ मे :
येथे तहसिल कार्यालयात २८ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली, अवघ्या ३० मिनीटात मतमोजणीची प्रक्रिया संपली ७ ग्रामपंचायतीपैकी ५ ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच निवडून आले आहेत. यात कुमरेज- परसामळ ग्रुप ग्रामपचायत, साळवे, कंचनपूर, वाघोदे, तावखेडा प्र बो या ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच निवडून आले आहेत. एकप्रकारे नामदार जयकुमार रावल यांचे शिंदखेडा मतदार संघावर आपले वर्चस्व कायम राहिले आहे, त्यांनी त्यांचा किल्ला अभेद्य ठेवला आहे .
 
 
वाघोदे येथे गोविंदा वाघ, कंचनपूर येथे गंगाबाई पाटील, परसामळ येथे नारायण गिरासे, साळवे येथे फुलपगारे इंदुबाई पुंडलीक, तावखेडा प्र.बो. येथे भामरे राकेश तर कदाणे येथे पारधी सरला, वालखेडा येथे मालचे लक्ष्मण हे निवडून आले. कदाणे व वालखेडा येथे कॉंग्रेस समर्थक उमेदवार सरपंचपदी निवडून आले आहेत.
 
 
तावखेडा प्र.बो. : येथील सरपंचपदासाठी राकेश भामरे यांना ४८३ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार माया भामरे यांना ४८० मते मिळाली या ठिकाणी ‘नोटा’ ला १२ मते मिळालेली आहेत.
 
 
कदाने : ग्रामपंचायतमध्ये ९ सदस्य पैकी १ जागा माघारीं अंती बिनविरोध झाली आहे. उर्वरित ८ जागांसाठी मतदान घेण्यात आले त्यात प्रभाग क्र १ मधून पारधी सुरेश, पारधी संगीता, पाकळे माधुरी प्रभाग क्र २ मधून पाटील रावसाहेब, तावडे सुनिता ,पाटील इंदुबाई. प्रभाग क्र ३ मधून कोळी दगुबाई, पवार मनिषा या निवडून आल्या आहेत.
 
 
या आधी माघारी अंती रविकिरण बैसाणे बिनविरोध निवडून आले आहेत तर साळवे ग्रामपंचायत येथे ३ प्रभागातून ९ जागांसाठी मतदान घेण्यात आले त्यात प्रभाग क्र १ मधून दिगंबर बोरसे, संतोष वाघ, ठाकरे सुनिता प्रभाग २ मधून मनिषा पाटील, रत्ना ठाकूर, पुष्पा बोरसे, प्रभाग ३ मधून प्रवीण अहिरे, भारती वैशाली, गिरासे ममता हे उमेदवार निवडून आले आहेत.
 
 
तावखेडा : प्र.बो. ग्रामपंचायतमध्ये ३ प्रभागातून ९ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती यापैकी प्रभाग क्र ३ मधून तिघेही जागा माघारी अंती बिनविरोध झाल्या आहेत . प्रभाग १ मधून गणेश जाधव, प्रदीप रोकडे, ज्योत्स्ना गिरासे प्रभाग क्र २ मधून विजय साळुंके, हिराबाई साळुंके , दिपाली पाटील प्रभाग क्र ३ मधून तिघेही जागा बिनविरोध झाल्या असून यात अनिल भामरे, रंभाबाई भिल, सतीबाई भिल या अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत.
 
 
परसामळ : येथे ९ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली यापैकी प्रभाग क्र. २ मधून २ जागा तर प्रभाग क्र. ३ मधून १ जागा माघारी अंती बिनविरोध झाल्या आहेत . तर प्रभाग १ मधून कृष्णा शिरसाठ, निंबाबाई गिरासे, धनकोर गिरासे प्रभाग क्र. २ मधून गिरासे जोतेसिंग हे निवडून आले असून या ठिकाणी भिल देविदास आणि भिल लताबाई या बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग ३ मधून बैसाणे रमणबाई व मालचे अक्षया या निवडून आल्या असून अशोक पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.
 
 
कंचनपूर : येथे ३ प्रभागातून ९ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली त्यात प्रभाग क्र १ मधून रोहिदास मालचे, सरलाबाई मालचे, इंदुबाई मोरे प्रभाग क्र २ पाटील रमेश, कैलास पाटील, पाटील नागीनबाई , प्रभाग ३ मधून विजय पाटील, आशाबाई पाटील, प्रतिभा पाटील हे उमेदवार निवडून आले आहेत.
 
 
वालखेडा : येथे ११ जागांसाठी निवडणूक झाली असून यात १ जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्याने १० जागांसाठी मतदान घेण्यात आले त्यात प्रभाग १ मधून ठाकरे कैलास, वानखेडे शकुंतलाबाई, अहिरे मनिषा प्रभाग २ मधून सोनवणे कस्तुराबाई, आरती भदाणे, ठाकरे रुपाली प्रभाग ३ मधून मोरे भिवसन, ठाकरे शाना, येळवे सुनिता, येळवे सुशिलाबाई हे निवडून आले आहेत.
 
 
वाघोदे : येथे ७ जागांसाठी ३ प्रभागातून निवडणूक घेण्यात आली यात प्रभाग क्र १ मधून ज्ञानेश्वर पाटील, हिरकनबाई भिल, प्रभाग क्र २ मधून गोविंदा वाघ, मंगलाबाई माळी, प्रभाग क्र ३ मधून गणेश पाटील, नीलिमा पाटील, मनिषा पाटील विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी सरपंच पदासाठी विजयी झालेले गोविंदा वाघ हे प्रभाग क्र. २ मधून सदस्य पदासाठी देखील विजयी झाले आहेत .
 
 
विजयी उमेदवारांनी, त्यांच्या समर्थकांनी निकाल घोषित झाल्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात एकच जल्लोष केला होता. मतमोजणीची प्रक्रिया तहसीलदार सुदाम महाजन व निवासी नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत लिपिक दिपक माळी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली
 
 
मतमोजणीच्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या आवारात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक सतीश बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय रमेश चव्हाण, विनोद पाटील, पी एस आय भास्कर शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 
कंचनपूरला ‘नोटा’मतांची कमाल,
२ मतांनी पराभव, रडू अनावर...
कंचनपूर येथे भाजपाचे सरपंच निवडून आले तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ५ सदस्य विरोधी गटाचे विजयी झाले आहेत. येथे सरपंचपदाच्या उमेदवार गंगाबाई पाटील यांना ५६३ मते तर पराभूत उमेदवार प्रतिभा पाटील यांना ५६१ मते मिळाली. आश्‍चर्यकारक असे की याठिकाणी ५ मते नोटाला मिळाली आहे. प्रतिभा पाटील यांचे पती अनिल पाटील यांना मतमोजणीनंतर मतमोजणी केंद्रात रडू कोसळले आणि ‘मी कोणते पाप केले त्यामुळे मतदारांनी आम्हाला दोन मतांनी पराभूत केले’, अशा शब्दात त्यांनी दु:ख व्यक्त केले. नोटाला मिळालेली पाच मते विजयी उमेदवारासाठी फायदेशीर ठरली. हा निकाल अतिशय धक्कादायक ठरला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@