पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज ५४ वी पुण्यतिथी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची ५४ वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. १४ नोव्हेंबर १८८९ या दिवशी जन्म झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरु यांचे निधन २७ मे १९६४ रोजी झाले.
 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर वरुन जवाहरलाल नेहरु यांना श्रद्धांजली अर्पण करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच राहुल गांधी यांनी शांतीवर येथे जवाहरलाल नेहरु यांच्या समाधीस्थळावर पुष्प अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन संपूर्ण देशात 'बाल दिवस' च्या रुपात साजरा करण्यात येतो.
 
 
 
 
 
जवाहरलाल नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, आजच्या दिवशी संपूर्ण भारतातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहेत, तसेच त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांना समाज माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@