२०१९ मध्ये प्रादेशिक पक्षांचीच सत्ता : चंद्राबाबू नायडू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2018
Total Views |

पक्षाच्या महामेळाव्यामध्ये विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन



विजयवाडा :
'येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक राज्यातील स्थानिक पक्ष हे खऱ्या अर्थाने 'किंगमेकर' ठरणार असून भाजप विरोधात सर्व प्रादेशिक पक्षाने आपापल्या राज्यांमध्ये एकत्र यावे' असे आवाहन तेलग देशम पक्षाचे अध्यक्ष तसेच आंध्राचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी आज केले आहे. विजयवाडा येथे आयोजित तेलगु देशम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यामध्ये आज ते बोलत होते.

'देशातील जनतेचे भले होईल, याआशेने टीडीपीने भाजपला त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये साथ दिली. परंतु नोटाबंदी दरम्यान देशातील जनतेची झालेली अवस्था आणि त्यानंतर आंध्रामधील जनतेबरोबर केलेला विश्वास घात यासर्वांमुळे टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याने याविषयी चिंता न करता आपल्या पक्षासाठी आता पुन्हा एकदा प्रयत्न केले पाहिजेत. कारण येत्या २०१९ मध्ये प्रादेशिक पक्ष हेच खऱ्याअर्थाने आपली सत्ता गाजवणार आहे,' असे मत नायडू यांनी यावेळी व्यक्त केले.

'आंध्रप्रदेश विशेष राज्याचा दर्जा दिला जावा' ही मागणी सरकारने मान्य न केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपूर्वी नायडू यांच्या टीडीपीने भाजपची साथ सोडली आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर आंध्रामध्ये दोन्ही पक्षामध्ये कमालीचे मतभेद वाढत आहेत. दरम्यान तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या प्रस्तावित तिसऱ्या आघाडीमध्ये नायडू हे प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील सध्या सुरु आहे. त्यात आज त्यांनी सर्व विरोधकांप्रमाणेच भाजप विरोधात सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केल्यामुळे भाजपसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

@@AUTHORINFO_V1@@