बनावट पावती ने सरकारी बँकेची १ लाख ७० हजाराची फसवणुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2018
Total Views |
 
 
बनावट पावती ने सरकारी बँकेची १ लाख ७० हजाराची फसवणुक
नंदुरबार , २७ मे
स्टेट बँक ऑफ इंडियाची १ लाख ७० हजारांची बनावट पावती व शिक्का बनवुन बँकेची फसवणुक केली म्हणून २६ रोजी नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अशोक सावु वसावे रा.बंधारे ता. नवापुर यांनी जानेवारी ते २ एप्रिल २०१८ दरम्यान उमाकांत देविदास हिरे यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपये घेवून स्टेट बँक ऑफ इंडियाची बनावट फिक्स डिपॉझीटची पावती तयार करुन देवून बँकेचा बनावट शिक्का मारुन बँकेची फसवणुक केली. याबाबत कमलेशकुमार देवेंद्रसिंग , व्यवस्थापक एसबीआय नवापूर, यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलीस ठाण्यात २६ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अशोक वसावे यास अटक करण्यात आली असून तपास सपोनि भंडारे करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@