पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मेरठ एक्सप्रेस वे चे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2018
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वे च्या पहिल्या भागाचे उद्घाटन करण्यात आले. या हायटेक पेरीफेरल एक्सप्रेस वे ला त्यांनी देशाच्या जनतेला समर्पित केले आहे. ११ हजार कोटी रुपयांच्या निधीतून तयार झालेल्या या एक्सप्रेस वे मुळ आता दिल्ली ते मेरठ हे अंतर केवळ ४५ मिनिटात पार करता येणार आहे.


 
 
आधुनिक तंत्रज्ञान आणि सौर उर्जा याने परिपूर्ण असणारा हा एक्सप्रेस-वे भारतातील पहिला १४ लेनचा एक्सप्रेस-वे ठरणार आहे. सध्या या एक्सप्रेस-वे चे दिल्लीमध्ये ९ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. सौर उर्जेने परिपूर्ण आणि पर्यावरण पूरक हा भारतातील पहिला एक्सप्रेस-वे ठरणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी उद्यान या एक्सप्रेस-वे मध्ये तयार करण्यात येणार आहेत. या एक्सप्रेस-वे च्या माध्यमातून दिल्ली ते मेरठ केवळ ४५ मिनिट लागणार आहेत.
 
 
 या दोन्ही एक्सप्रेस-वे मुळे दिल्ली आणि गाजियाबाद येथील वाहतूक कोंडीपासून सुटका मिळेल. तसेच व्यावसायिक वाहतूक यामुळे ३० टक्क्यांनी कमी होईल या दोन्ही एक्सप्रेस-वे वर मिळून दिवसातून ५२,००० गाड्या प्रवास करू शकतात. या एक्सप्रेस-वे मुळे प्रदूषणात घट, वेळेची बचत आणि इंधनची देखील बचत होणार आहे. ५०० दिवसांच्या अथक मेहनतीने हा एक्सप्रेस-वे काही प्रमाणात तयार करण्यात आला असून १३५ किलोमीटर एवढा लांब हा एक्सप्रेस-वे असणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@