यंदा भारत आयोजित करणार जागतिक पर्यावरण दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिवसाचे यावर्षीचे आयोजन भारत करणार आहे. प्रदूषणाच्या विरूद्ध भारत सकारात्मक भूमिका घेत असल्याने यावर्षीची जागतिक पर्यावरण दिवसाचे आयोजन करण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रसंघाने भारताकडे दिली आहे. त्यामुळे यावर्षी पर्यावरण विषयक होणारी जागतिक परिषद ही भारतात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 
 
 
 
दरवर्षी ५ जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस जगभर साजरा केला जातो. जागतिक पर्यावरणाचा समतोल राखता यावा या उद्देशाने ही परिषद दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित केली जाते. पर्यावरण विषयक भारताचे काम पाहून संयुक्त राष्ट्र संघाने यावर्षी ही परिषद भारतात आयोजित करण्याचे काम भारताला दिले आहे. 
 
 
 
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात या परिषदेचे आयोजन करण्यात येईल. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील मंत्री भाग घेतील. प्लास्टिक कचऱ्याला कमी करणे हा यावर्षीच्या परिषदेचा मुख्य विषय आहे. पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून देशभरामध्ये खूप जोरात या दिवसाची तयारी करण्यात येत आहे. यासाठी १९ राज्यांतील २४ समुद्र तट आणि २४ नदी स्वच्छ करण्यात येत आहे. पर्यावरण मंत्री यांनी प्रदूषणाशी चार हात करण्याचे आवाहन केले आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@