सद्धिविनायक युवा संस्थेने क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |



टिटवाळा, सिद्धिविनायक युवा संस्थेच्यावतीने क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सध्याच्या युगात मोबाईल आणि टिव्ही च्या अतोनात वापरामुळे मुले मैदानी खेळांपासून लांब जात आहेत. त्याच प्रमाणे पूर्वी मोठ्या प्रमाणात खेळले जाणारे पारंपारिक खेळ लगोरी, विटी दांडु, गोट्या, लपाछपी, खो-खो व इतर मनोरंजनात्मक खेळ ह्या काळाच्या ओघात लुप्त होत असताना त्याची ओळख व वेगळेपण मुलांना कळावे या हेतुने सिद्धिविनायक युवा संस्था, टिटवाळा आयोजित वे उन्हाळी साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिर २०१८ आयोजित करण्यात आले होते .

हे कुमारवयीन मुला-मुलींना साहसी खेळांचे अनुभव घेण्यासोबतच व्यक्तिमत्व विकास योग्य रीतीने होण्याची संधी देण्यासाठी व सुट्टीची धम्माल करण्याकरीता काही नवीन अनुभव, नवीन ज्ञान मिळवण्यासाठी, नवीन खेळ व त्यासोबतच खेळातील नवीन तंत्र कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तसेच लुप्त होणार्या पारंपारिक खेळ आधुनिक मुलांच्या मनात रुजविण्यासाठी विश्वासराव फार्म हाऊस, मानीवली येथील निसर्गसंपन्न परिसरात दिनांक २१ ते २३ मे २०१८रोजी दिवसीय निवासी क्रीडा प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

@@AUTHORINFO_V1@@