घुग्गुस आणि पोंभूर्णा येथे अत्याधुनिक बस स्थानकांच्या बांधकामाला मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
चंद्रपूर : अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील घुग्गुस आणि पोंभूर्णा येथे अत्याधुनिक बस स्थानकांचे बांधकाम करण्यात येणार असून घुग्गुस येथे ८  कोटी १८  लक्ष ७०  हजार १५० रू. तर पोंभूर्णा येथे ६ कोटी ४८ लक्ष २४  हजार १८२  रू. किंमतीचे बस स्थानकांचे बांधकाम करण्याच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
 
 
 
घुग्गुस येथील बस स्थानकाची पुर्नबांधणी करण्यात येणार असून पोंभूर्णा येथे नव्या बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. आमदार नानाजी शामकुळे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी घुग्गुस येथे अत्याधुनिक बस स्थानकाचे बांधकाम करण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली व त्या माध्यमातून अर्थमंत्र्यांनी ही मागणी पूर्णत्वास आणली आहे.
 
 
 
पोंभूर्णा येथील नागरिकांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अत्याधुनिक बस स्थानकाचे बांधकाम करण्याबाबत जाहीरपणे दिलेला शब्द पूर्णत्वास येत आहे. या दोन्ही बस स्थानकाच्या ठिकाणी इमारत, फर्निचर, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, वाहनतळ बांधकाम, सोलर पॅनेल लाईटिंग, धूप प्रतिबंधक व्यवस्था, विंधन विहिर व पंप हाऊस बांधकाम आदींचे बांधकाम करण्यात येणार असून त्या माध्यमातून अत्याधुनिक बस स्थानकाचे जनतेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर , बल्लारपूर , मुल या शहरांमध्ये मंजूर अत्याधुनिक बस स्थानकांची बांधकामे प्रगतीपथावर आहेत . 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@