आम्ही १२ जूनला भेट घेवू शकतो : डोनाल्ड ट्रम्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांची भेट १२ जून या दिवशी होवू शकते. आम्ही १२ जूनला भेट घेवू शकतो असे काल पत्रकार परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. १२ जूनला डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन हे दोन्ही नेते सिंगापूर येथे भेट घेणार होते. मात्र काही बोलाचालीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भेट घेण्याचे रद्द केले होते. 
 
 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याकडून ही भेट रद्द केली असून याचे निश्चित कारण स्पष्ट केले नाही. मात्र सध्या या दोन्ही देशांमध्ये अणु विषयावरून तणाव सुरु असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी ही बैठक रद्द केली आहे असे म्हटले जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून किम जोंग उन तणावपूर्ण वक्तव्य करीत आहे त्यामुळे देखील ही बैठक रद्द करण्यात आली होती असे म्हटले जात आहे. 
 
 
 
मात्र आता ही भेट खरचं होणार काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याकडून ही भेट रद्द केली होती. मात्र आता ते पुन्हा ही भेट घेवू शकतात असे म्हटले जात आहे. ही भेट झाली तर अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये काहीसा ओलावा येईल आणि जागतिक स्तरावर निर्माण होणारी चिंता जरा कमी होईल. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@