भारत आणि बांग्लादेश एकमेकांपासून खूप शिकू शकतात : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
पश्चिम बंगाल : भारत आणि बांग्लादेश एकमेकांपासून खूप काही शिकू शकतात असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज पश्चिम बंगाल येथे शांती निकेतनचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील उपस्थित होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये बांग्लादेश भवनाचे उद्घाटन देखील केले. तसेच नरेंद्र मोदी यांनी विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात सहभाग नोंदविला.
 
 
 
 
 
 
 
बांग्लादेश आणि भारत सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात सारखा आहे. जन भागीदारी शिवाय देश पुढे जावू शकत नाही. जनता एक पाऊल पुढे टाकेल तर सरकार चार पाऊल पुढे टाकेल. यामुळे देशाचा विकास होवू शकतो असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आज देशामध्ये सगळ्या नागरिकांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे त्यामुळे यासाठी शिक्षणाशी जोडलेल्या संस्था काढणे गरजेचे आहे असे मत नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@