कुमारस्वामी सरकारचे बहुमत सिद्ध !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |



बेंगळूरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी आज कर्नाटक विधानसभेमधील बहुमत यशस्वीपणे जिंकले असून सभागृहातील २२२ पैकी ११७ आमदारांचा पाठींबा कुमारस्वामी यांच्या सरकार मिळालेला आहे. त्यामुळे कॉंग्रेस-जेडीएसच्या या नव्या सरकारचा पुढील मार्ग आता प्रशस्त झाला आहे.
आपल्या सर्व आमदारांसह मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री जी.परमेश्वरा हे आज सभागृहामध्ये दाखल झाले. कुमारस्वामी यांनी सभागृहासमोर विश्वास ठराव मांडल्यानंतर भाजप नेते येडीयुरप्पा हे सभागृहामध्ये बोलण्यासाठी म्हणून उभे राहिले. यावेळी भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस आणि जेडीएसच्या या सरकारला जोरदार विरोध करत, बहुमत चाचणी अगोदरच सभा त्याग केला. येडीयुरप्पा यांनी सभा त्याग करण्याअगोदर दोन्ही पक्षांवर जोरदार टीका करत राज्यातील शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भाजप येत्या २८ तारखेला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

भाजपने सभा त्याग केल्यानंतर बहुमत चाचणी घेण्यात आली. यामध्ये कॉंग्रेस आणि जेडीएस असे मिळून एकूण ११७ आमदारांचा पाठींबा कुमारस्वामी यांच्या सरकारला मिळाला. यानंतर कुमारस्वामी यांनी आपले मत सभागृहासमोर मांडले. सरकार स्थापन करण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांचे त्यांनी आभार मानले. तसेच २००४ च्या निवडणुकांप्रमाणेच यंदाचा निकाल आला असल्याचे त्यांनी म्हटले. जनतेनी यंदा खंडित जनादेश दिल्यामुळे कर्नाटकाच्या जनतेच्या भल्यासाठी म्हणून कॉंग्रेसच्या सहकार्याने जेडीएसने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे हे सरकार पूर्णपणे सामान्य जनतेचे असून कर्नाटकच्या जनतेच्या हितासाठीच कार्य करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
@@AUTHORINFO_V1@@