...अन मोदींनी दिला चार वर्षांचा हिशोब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |

सरकारच्या कामगिरीचा डिजिटल कार्यअहवाल सादर 



नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांमध्ये मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा सविस्तर अहवाल आज केंद्र सरकारने सादर केला आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारने हा अहवाल पूर्णपणे 'डिजिटल' पद्धतीने सादर केला असून गेल्या चार वर्षांमध्ये सरकारने केलेली कामगिरी आणि त्यापासून झालेले फायदे यांची सविस्तर माहिती सरकारने आपल्या या 'डिजिटल' अहवालामध्ये दिली आहे. |


मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने '48 monthes of transforming india' या नावाने https://48months.mygov.in/ हे नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळावर 'फोक्स एरिया' (Focus Areas) आणि 'परफॉर्मन्स डॅशबोर्ड' (Performance Dashboard) असे दोन पर्याय दिले आहेत. यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये सरकारने केलेल्या सर्व कार्यांची आकड्यांसह डिजिटल माहिती केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे.


वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांची आकडेवारी :





विशेष म्हणजे ही सर्व माहिती ऑनलाईन असल्यामुळे यावरील सर्व आकड्यांची अपडेट माहिती नागरिकांना उपलब्ध झाली आहे. यामध्ये सरकारने पंतप्रधान जनधन योजना, आवास योजना, उज्ज्वला योजना, पेन्शन योजना, पायाभूत सुविधांची उभारणी, ओडीएफ, युवक सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण, शेतकरी सक्षमीकरण, स्वच्छ भारत अभियान यासह गेल्या चार वर्षांमध्ये सरकारने सुरु केल्या सर्व योजनांची आणि त्यांच्या लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच नुसती लेखी न देता, त्या योजनेशी संबंधीत आकडेवारी, लाभार्थ्यांचे फोटो आणि त्यांच्या मुलाखतींच्या चित्रफिती देखील या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनांची नेमकी व्याप्ती लक्षात येते.

सरकारने केलेल्या विविध क्षेत्रातील कार्यांचे अहवाल :





२०१४ मध्ये बहुमताने केंद्रामध्ये सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे आपल्या पहिल्या दिवसांपासून विरोधकांच्या विरोधाला आणि त्यांच्या नाना प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जात आले आहे. मोदी सरकार जनतेसाठी नेमके काय करत आहे ? हा प्रश्न सरकारच्या पहिल्या १०० दिवसांपासून विरोध सरकारला विचारत आले आहे आणि यावरून सरकारला सातत्याने घेरत आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देखील आपल्या सरकारच्या १०० दिवसांच्या पूर्तीनंतर पालघर येथे झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारसभेत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत, 'सरकारच्या एका एका मिनिटाचा हिशोब देऊ' असे उत्तर दिले होते. यानंतर सातत्याने विरोधकांची टीका, त्यांचे प्रश्न आणि नाना प्रकारचे आरोपांचा सामना करत या सरकारने नुकतीच आपली चार वर्ष पूर्ण केली आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या या चार वर्षांमधील ४८ महिन्यांमध्ये सरकारने नेमकी काय कामगिरी केली आहे ? याचा सविस्तर अहवाल मोदी सरकारने ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला असून यामुळे विरोधकांची आता चांगलीच बोलती बंद होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@