का टाकतायत सर्वजण आपला व्यायाम करतानाचा व्हिडियो ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |





सोशल मिडियावर तुम्ही फॉलो करत असलेले सेलेब्रिटी, तुमचे मित्र, मंत्री हे सर्व त्यांचा व्यायाम करतानाचा व्हिडियो अपलोड करत आहेत. त्यावर दोन हॅशटॅग पण टाकत आहेत आणि हे चॅलेंज त्यांच्या अजून तीन मित्रांना ते देत आहेत. ज्याला टॅग केले अलेस त्या व्यक्तीने स्वत: चा फिटनेसचा व्हिडियो अपलोड करावा आणि अजून तीन जणांना टॅग कराव. अश्यानी ही चेन पुढे चालत राहिलं आणि सर्वांना यातून प्रेरणा मिळेल.

 
काय आहे हे फिटनेस चॅलेज ? भारताचे केंद्रिय क्रीडा मंत्री आणि ऑलिंम्पिक पदक विजेते राज्यवर्धन सिंह राठोर यांनी या सोशल मिडिया चॅलेंजची सुरूवात केली. आपल्या सरकारी ऑफिसमध्ये असून सुध्दा त्यांनी १ मिनीटामध्ये पुश अप्स मारून हम फिट तो इंडिया फिट चा नारा दिला आहे. जेणेकरून हा मंत्र सर्वजण आपल्या आचरणात आणतील आणि भारत एक फिट देश म्हणून नावारूपाला येईल.
 

 
 
 
 
 
 
या हेतूने सुरू झालेले हे चॅलेंज सेलिब्रिटींमध्ये तर हिट झालंच पण सामान्य लोकांमध्येही याची खूप क्रेज सध्या पाहायला मिळते आहे. राठोर यांच्याप्रमाणेच लोक ऑफिस, समुद्र किनारी, जीम मध्ये आपले व्हिडियो शूट करून सोशल मिडियावर पोस्ट करत आहेत. 




त्यामुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून उभी राहिलेली ही चळवळ यशस्वी होवो आणि हम फिट तो इंडिया फिटचा नारा बुलंद होवो.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
- पद्माक्षी घैसास
@@AUTHORINFO_V1@@