निपाह विषाणूमुळे केरळमध्ये आत्तापर्यंत ११ नागरिकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
केरळ : केरळमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारा निपाह वायरस याने आत्तापर्यंत केरळमध्ये ११ नागरिकांचा जीव घेतला आहे. या वायरसमुळे दिवसेंदिवस नागरिकांचा मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. सध्या दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, गोवा, राजस्थान, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांमध्ये धोक्याची सूचना देण्यात आली आहे. 
 
 
वरील राज्यांमध्ये देखील या वायरसचे रुग्ण आढळू शकतात तसेच इतर नागरिकांनी याची काळजी घ्यावी असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या विषाणुचा प्रसार मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकते. निपाह विषाणुची लागण माणसापासून माणसास होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असते. 
 
 
काय आहे निपाह वायरस ? 
 
 
निपाह वायरस हा मुख्यतः वाटवाघुळापासून निर्माण झालेला आहे. १९९८ मध्ये सर्वात प्रथम मलेशियामध्ये हा वायरस सापडला होता. मलेशियामधील डुक्कर प्राण्यांमध्ये सर्वात प्रथम हा वायरस आढळून आला होता. यानंतर यावर संशोधन सुरु करण्यात आले होते. या संशोधनानुसार फळे खाणारी वटवाघुळे अर्थात फ्रुट बॅट्स हे या विषाणूचे मूळ वाहक आहेत. निपाहग्रस्त वटवाघुळाने एखादे फळ खाल्ल्यास त्या उष्ट्या फळापासून इतर प्राण्यांना व त्यानंतर माणसांना या रोगाची लागण होते. मलेशियामध्ये यामुळे काही प्राणी दगावल्याचे देखील समोर आले होते. त्यानंतर २००१ ते २००४ मध्ये बांगलादेशामधील काही नागरिकांना या वायरसची लागण झाली होती. यामुळे बांगलादेशामध्ये तब्बल ५० जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर भारतामध्ये काही ठिकाणी देखील रोगाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आलेली होती. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@