ठोकशाही नको लोकशाही हवी : अशोक चव्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |



पालघर : 'भाजप-सेनेनी गेल्या चर्चा वर्षांमध्ये पालघरच काडीचा देखील विकास केलेला नाही, उलट विकासाच्या नावावर दमदाटी करून येथील जमिनी बळकावण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही ठोकशाही मोडून लोकशाही मोडून काढण्यासाठी जनतेनी पुढाकार घ्यावा', असे आवाहन कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज केले आहे. पालघर येथे आयोजित सभेमध्ये आज ते बोलत होते.


'भाजप आणि सेना म्हणजे 'आपण दोघे भाऊ आणि मिळून खाऊ' अशी यांची गत आहे. राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारने गेल्या चार वर्षात वसई, विरार, पालघरच्या विकासासाठी केलेले एक काम दाखवावे व नंतर यांनी मते मागावीत. काँग्रेस सरकारने पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. परंतु भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यापासून पालघर जिल्ह्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. उलट येथील विकास सोडून येथील नागरिकांच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न यांनी सुरु केले आहे. त्यामुळे अशा कावेबाजांना नागरिकांनीची धडा शिकवला पाहिजे' असे ते म्हणाले.


याचबरोबर सरकारच्या विविध योजनावर देखील त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. मोदी सरकारच्या बुलेट ट्रेनचे स्वप्न हे अत्यंत पोकळ असल्याचे म्हणत, पालघरच्या नागरिकांना बुलेट ट्रेन नको तर कामाला जाण्यासाठी म्हणून लोकल ट्रेन हवी, त्यामुळे सरकारने नागरिकांच्या हिताकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

@@AUTHORINFO_V1@@