जात प्रमाणपत्र वितरणाकरीता शिबीराचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |
 
 
 

हिंगोली :  विशेष मोहिमेतंर्गत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांच्यावतीने माहे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातील विद्यार्थी, सेवा, निवडणूक इत्यादी लाभार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी संचयीकेची तपासणी करुन जवळपास १  हजार ५९५  जात वैधता प्रमाणपत्र तयार केली आहेत. सदर कालावधीत एकूण सेवा विषयक १०३  जात वैधता प्रमाणपत्र, शैक्षणिक १ हजार ४२७  तथा निवडणूक विषयक ६५  जात वैधता प्रमाणपत्र तयार केली आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत संबंधित लाभार्थ्यांना एस.एम.एस. द्वारे संदेश देऊन तथा स्पिडपोष्टाद्वारे काही प्रमाणपत्र संबंधीतांना वितरीत करण्यात आली आहे.
 
 
 
या व्यतीरिक्त वरील कालावधीतील उर्वरित सर्व जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेतंर्गत दिनांक २३  ते २५ मे, २०१८ या कालावधीत जात प्रमाणपत्र वितरणाचे शिबीर आयोजित केलेले आहे. आज रोजी एकूण ४५०  ते ५००  जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली येथे प्रत्यक्ष येऊन आपले होऊन जात वैधता प्रमाणपत्र येत्या दोन दिवसात नेण्याचे आवाहन एस.एम.एस. द्वारे सर्व लाभार्थ्यांना करण्यात आले आहे, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांनी केले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@