नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा विजय झाला आहे. दराडे यांना एकूण ४०१ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना २३० मते मिळाली.
 
 
निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी १५० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शांततेत मतमोजणी पार पडली. उमेदवार प्रतिनिधी म्हणून विनायक पांडे, अर्जुन टिळे, सुधाकर बडगुजर, जालिंदर ताडगे, सचिन ठाकरे यांनी काम बघितले.
 
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. निवडणुकीत एकूण ६४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला होता. यात १३ मते बाद ठरविण्यात आली. ६३१ मते वैध होती. यात ३१६ मते ज्या उमेदवाराला मिळतील तो उमेदवार या निवडणुकीत विजयी होईल, हे निश्चित झाले. त्यानंतर दराडे यांच्या पारड्यात जास्त चिठ्ठ्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी उमेदवार शिवाजी सहाने आणि अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांनी मतमोजणी कक्षातून काढता पाय घेतला. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अधिकृत घोषणा होण्याआधीच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
 
दरम्यान ”आपल्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांचा पाठिंबा कामी आला,” असे वक्तव्य आ. नरेंद्र दराडे यांनी केल्याने ते वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@