टोयोटा यारिस कारला नाशिकच्या ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : टाटा कंपनीने यारिस ही कार मंगळवार दि. २२ मे रोजी नाशिकमध्ये लाँच केली. पहिल्याच दिवशी १० कारचे बुकिंग करण्यात आल्याने नाशिकमध्ये त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती वासन टोयोटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेंद्र पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
पहिल्या दहा ग्राहकांना टोयोटा किर्लोस्करचे व्यवस्थापक तन्मय भट्टाचार्य यांच्या हस्ते कारची चावी देण्यात आली. यावेळी संचालक प्रदीप वासन, हरीश शर्मा, तेजिंदर बेदी आदी उपस्थित होते. ही कार आकर्षक ६ रंगांमध्ये उपलब्ध आहे. टोयोटाने ही कार ४ व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. यात मॅन्युअल आणि सीवीटी ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
 
या कारच्या टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिममध्ये गेस्चर कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम असे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चारही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यासोबतच कारमध्ये ७ एअरबॅग्स, हिल स्टार्ट असिस्ट, एबीएससारखी फीचर्स देण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@