चुकी आढळल्यास गोगईंवर कठोर कारवाई : लष्कर प्रमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |

 
 
श्रीनगर : भारतीय लष्कर अधिकारी मेजर गोगई यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतीय लष्कराने यावर आज पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'भारतीय लष्करामध्ये सर्व जवानांना समान नियम आणि कायदे लागू आहेत. त्यामुळे जर मेजर गोगई यांच्यावर कसलाही प्रकारचा आरोप सिद्ध झाल्यास त्यांना अशी शिक्षा केली जाईल, जी सर्वांसाठीच एक उदाहरण बनेल' अशी प्रतिक्रिया लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आज दिली आहे. श्रीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते आज बोलत होते.

'कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याने जर लष्कराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला, तर हे लष्करासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यामुळे तो अधिकारी कोणत्याही स्तरावरील असला तरी देखील त्याला शिक्षा केली जाईल. मे. गोगई हे यांच्यावरील गुन्हा जर सिद्ध झाला त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई लष्कराकडून केली जाईल. तसेच शिक्षा अशी असेल कि इतरांसाठी एक उदाहरण बनेल' असे रावत यांनी यावेळी म्हटले.


गेल्या काही दिवसांपूर्वी मे. गोगई यांना श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये दोन अल्पवयीन मुलींसह पकडल्याची बातमी समोर आली होती. यानंतर गोगई हे या दोन मुलींचे शोषण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर लावला जात होता. परंतु याविषयी थोड पुरावे मात्र समोर आलेले नव्हते. दरम्यान काहींच्या मते गोगई यांना जाणूनबुजून फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लष्कर प्रमुखांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@