डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात होणारी बैठक रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
सिंगापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांची १२ जून या दिवशी भेट होणार होती मात्र आता ही भेट रद्द करण्यात आली आहे. १२ जून या दिवशी हे दोन्ही नेते एका बैठकीत भेट घेणार होते. मात्र आता डोनाल्ड ट्रम्पकडून ही भेट रद्द करण्यात आली आहे. 
 
 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याकडून ही भेट रद्द केली असून याचे निश्चित कारण स्पष्ट केले नाही. मात्र सध्या या दोन्ही देशांमध्ये अणु विषयावरून तणाव सुरु असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी ही बैठक रद्द केली आहे असे म्हटले जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून किम जोंग उन तणावपूर्ण वक्तव्य करीत आहे त्यामुळे देखील ही बैठक रद्द करण्यात आली आहे असे म्हटले जात आहे. 
 
 
 
गेल्या दोन वर्षांपासून अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तसेच दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्या दिल्या होत्या, तर अमेरिकेने कोरियन सागरामध्ये आपल्या युद्ध नौका देखील सज्ज केल्या होत्या. त्यामुळे यावर शांततेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावा अशी जगाची इच्छा होती. त्यामुळे दोन्ही नेते भेट घेवून यावर उपाय करणार होते मात्र आता ही भेट देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केली आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@